111 marathi suvichar sangrah | मराठी सुविचार संग्रह marathi suvichar संग्रह ,marathi quotes,motivationa quotes and l thoughts

                                        


  1. ज्याची चांगुलपणावर श्रद्धा आहे त्याला कशाचेही भय वाटत नाही.
  2.  तुमच्यावर हल्ला करणाऱ्या शत्रूला भिऊ नका परंतु तुमची स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध रहा.
  3. सगळी नाती स्वार्थाभोवती गुंफलेली असतात. स्वार्थ संपला की कोणतंच नातं उरत नाही.
  4. नम्रतेने जे लाभेल ते बलाने कधीही मिळणार नाही.
  5.  टीका आणि विरोध हीच एका समाजसुधारकास मिळालेली बक्षिसे असतात.
  6. ज्यांच्या आचार-विचारांत नेहमी दुसऱ्यांचे हितच असते तेच खरे साधू.
  7.  सद्गुण ,सदाचार व सद्विचार हे माणसाचे खरे अलंकार आहेत .
  8. मनुष्य विचारी असेल तर तत्वज्ञानी  बनतो व विकारवश असेल तर बेताल बनतो .
  9. भारतीय संस्कृती सत्यम ,शिवम ,सुंदरम चा शोध घेणारी आहे.
  10.  इष्ट असेल तेच बोला व शक्य असेल तेच करा .
  11. आपले हात नुसते घेण्यासाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी आहेत हे लक्षात ठेवा.
  12.  पुस्तके म्हणजे मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ आहेत.
  13.  विद्येचा उपयोग वादासाठी करावयाचा नसून तो विकासासाठी करावयाचा असतो.
  14.  सत्य असेल ते काळाच्या ओघात टिकेल असत्य असेल तर अदृश्य होईल .
  15. आईचे प्रेम जेथे असेल ती झोपडी राजाच्या ऐश्वर्यालाही लाजवील.
  16. उद्याचा भविष्यकाळ आजच्या त्यागातून निर्माण करावा लागतो.
  17.  देव, देश व मानव यांची सेवा करताना जो स्व देतो तो कृतार्थ होतो.
  18.  त्यागातच वैभव आहे संचयात नाही.
  19.  गरीब स्थितीतील समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण होय.
  20. जीवन किती काळ जगलात यापेक्षा जीवन कसे जगलात याला फार महत्त्व आहे.
  21. द्वेषाने द्वेषाला  कधीच जिंकता येत नाही.
  22. मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागविणे श्रेष्ठ होय . 
  23. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल पण जर तुमची जीभ चांगली असेल तर जग तुमच्या प्रेमात पडेल.
  24. जीवन चांगलेच असेल असे नाही त्याचा चांगला वापर करायला शिका.
  25. पुस्तके म्हणजे मानवी संस्कृतीला उजाळा देणारे दीपस्तंभ होय.
  26. सद् ग्रंथांचे वाचन म्हणजे सदाचाराच्या मार्गाचे व उत्कर्षाचे साधन.
  27. जाईचा मंडप आपल्या घरापुरता घातला तरी चालेल परंतु मायेचा मंडप शेजाऱ्याच्या घरापर्यंत घालावयास विसरू नका.
  28. संकटा पेक्षा संशय यशाला फार घातक असतो .
  29. श्रद्धा म्हणजे जीवन श्रद्धा जीवन जगण्याची शक्ती आहे दृढ श्रद्धा यातूनच महान कार्य निर्माण झाली आहेत.
  30.  स्वतःच्या घामातून जे प्राप्त होते ते लाख मोलाचे असते.
  31.  कष्टाने आणि नीतीने मिळविलेल्या मीठभाकरीत असलेली गोडी अन्यायाच्या  पक्वान्नात  नसते.
  32.  सन्मार्गावरून चालण्याची प्रेरणा मिळण्यासाठी नेहमी चांगल्या गोष्टी पहाव्यात व बोलावण्यात.
  33. नेतृत्व मागून मिळत नाही ते आपल्या कर्तुत्वाने मिळवायचे असते.
  34.  जगात माणूस शोभून दिसतो तो त्यांच्या हारांनी नाही तर घामाच्या धारांनी.
  35.  इतिहासापासून आपण धडा घेत नाही म्हणूनच इतिहासाची पुनरावृत्ती होते.
  36.  वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच.
  37.  इतिहास घडविण्यासाठी इतिहास वाचावा लागतो जतन करावा  लागतो.
  38.  जीवन फुलासारखे असू द्या पण ध्येय मात्र मधमाशी सारखे असू द्या.
  39.  चांगले विचार पेरा म्हणजे चांगले विचार जन्माला येतील चांगले आचार पेरा म्हणजे चांगले चरित्र जन्माला येईल.
  40. घृणा राक्षसी वृत्ती आहे क्षमा मनुष्याचे लक्षण आहे पण प्रेम म्हणजे देवत्वाचे प्रतीक आहे.
  41. बोलताना विचार करा बोलून विचारात पडू नका.
  42.  शहाणा माणूस चूक विसरतो पण त्याची कारणे मात्र कधीच विसरत नाही.
  43.  कोणत्याही प्रकारचा विजय नम्रतेने स्वीकारा व अपयश , पराजय खेळाडू वृत्तीने स्वीकारा.
  44. आपल्याला जे आवडते ते करण्यात मोठेपणा नसून आपल्याला जे करावे लागते ते आवडीने करण्यात मोठेपण आहे.
  45.  याचकाना त्यांना काहीही न देता  विन्मुख घालऊ नये.
  46. गेलेल्या संधीबद्दल रडत बसण्यापेक्षा येणार्‍या संधीचे स्वागत करा.
  47.  काही वेळा काही लोकांना किंवा काही लोकांना काहीवेळा तुम्ही फसवाल, पण सर्वच वेळी तुम्ही सर्वच लोकांना फसवू शकणार नाही.
  48.  वैराने वैर वाढेल हे निश्चित समजा परंतु प्रेमाने वैर घटेल म्हणून आपल्या वैऱ्यावर सुद्धा प्रेम करा.
  49.  एकत्र येणे म्हणजे प्रारंभ एकत्र राहणे म्हणजे प्रगती आणि एकत्र चिकाटीने व सातत्याने काम करीत राहणे म्हणजे यश होय.
  50.  द्वेषाने द्वेषाला कधीच जिंकता येत नाही.
  51.  पायदळी चुरगळलेले फुले चुरगळणाऱ्या पायांना आपला सुगंध अर्पण करतात.
  52.  ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे कारण पैशाचे तुम्हाला रक्षण करावे लागते तर याउलट ज्ञान तुमचे रक्षण करते.
  53.  माणसाच्या हातून कधीच चुका न होणे म्हणजे यश नव्हे तर एकच चूक दुसऱ्यांदा न होणे म्हणजे खरं यश होय.
  54.  शील घडवणारे ,मनाची शक्ती वाढवणारे, बुद्धीचा विकास करणारे आणि मनुष्याला स्वावलंबी बनवणारे शिक्षण असावे.
  55.  जीवन हे इतरांसाठी विचारपूर्वक वेचले तर जीवनाचे सोने होते हे ज्याला कळले तो ध्येयवादी होय.
  56.  समर्थ लेखणी एकाच वेळी लाखो लोकांना विचारमग्न करते परिपुष्ट करते कृतिशील बनविते.
  57.  तुमच्याने पुढे जाववत नसेल तर जाऊ नका पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.
  58.  अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काहीच किंमत राहिली नसती.
  59.  आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी शारीरिक सौंदर्यवर्धक साधने आहेत.
  60.  नवीन शिकण्याची उमेद ज्याची गेली तो म्हातारा.
  61.  कुटुंबातील अखंड प्रेमाचा झरा म्हणजे आई.
  62.  अविरत उद्योग हा शांती समाधानाचा झरा होय.
  63.  मित्राच्या मरण्यापेक्षा मैत्रीचे मरण असह्य असते .
  64.  संतांचे सुविचार आपल्या निकोप हृदयात अखंड ठेवावेत जीवनात ते मार्गदर्शन करतील.
  65.  ज्ञानाने बुद्धी जिंकता येते पण सेवेने अंत: करण जिंकता येते . 
  66.  ज्ञान मिळवण्याचे प्रबळ साधन म्हणजे वाचन होय.
  67.  सल्ला देणारे अनेक असतात पण मदत करणारे थोडेच असतात.
  68.  कर्ज कितीही उपकारक असले तरी ते ओझेच असते.
  69.  चिकाटी हे जीवनातील यशाचे साधन होय.
  70.  दृष्टांची संगत नेहमी यशाच्या रस्त्यावर काटे पसरते.
  71.  पवित्र होण्यासाठी जाळून घ्यावे लागते अंकुरित होण्यासाठी गाडून घ्यावे लागते.
  72.  जो स्पष्टवक्ता असतो तो कधीच कपटी नसतो.
  73.  जो कधीच चुकत नाही तो बहुदा काही करतच नसतो.
  74.  सूडाचा आनंद एक दिवस टिकतो क्षमा करण्याचे यश चिरंजीव आहे.
  75.  अविरत उद्योग हा शांती समाधानाचा झरा होय.
  76.  आपले अज्ञान कधीही लपवू नये.
  77.  आपल्या पावलांना मार्ग दाखविणारा एकच दिवा असतो तो म्हणजे अनुभवाचा.
  78.  ज्योतिष माणसाला दुबळं करत नकारात्मक भूमिका घ्यायला शिकवतं.
  79.  हृदयात अपार सेवा भरली की सगळीकडे मित्र दिसू लागतात.
  80.  अन्न म्हणजे देव आहे म्हणून त्याचा कधीही अपव्यय करू नये.
  81.  तुम्हाला कोणी फसवले म्हणून तुम्ही कोणाला फसवू नका.
  82.  श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करा.
  83.  आपण कसे दिसतो यापेक्षा कसे आहे याचा विचार करा.
  84.  चांगुलपणाचा मार्ग काटेरी असला तरी त्याची फळे मात्र गोड असतात.
  85.  समुद्रात त केवढेही प्रचंड वादळ झाले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही.
  86.  दैववादी मनुष्य सत्वर नाश पावतो.
  87.  कार्यात यश मिळो अथवा न मिळो पण प्रयत्न करण्यात कुचराई करू नका.
  88.  आधी जातो मनाचा तोल मग जातो शरिराचा तोल.
  89.  अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे.
  90.  जगाने माझ्यासाठी काय केले हे पाहण्या अगोदर मी जगासाठी काय केले हे विचारात घ्या.
  91.  तुम्हाला जर मित्र हवे असतील तर तुम्ही दुसऱ्यांचे मित्र  बना.
  92.  दोष काढणे सोपे पण ते सुधारणे अवघड.
  93.  दुसर्‍याला उपदेश करण्यासारखी सोपी गोष्ट नाही.
  94.  उष: कालाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे रात्र.
  95.  शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा कारण शब्दांची जखम सहसा लवकर बरी होत नाही.
  96.  संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो. 
  97.  भूत काळासाठी रडण्यापेक्षा वर्तमानकाळाशी लढण्यात आणि भविष्याच्या शिखरावर चढण्यात खरा  पराक्रम आहे.
  98. समोर अंधार असला तरी त्यापलीकडे प्रकाश आहे.
  99. भव्य विचार हा सुगंधा सारखा आहे.
  100. परिस्थितीच्या आधीन होण्यापेक्षा परिस्थितीवर मात करा.
  101. कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो.
  102. विद्यार्थी हा विद्या वर चरणारा राजहंस पक्षी आहे.
  103. आईसारखे दुसरे पवित्र दैवत जगात नाही.
  104. माता ही प्रेमाची सरिता आहे.
  105. मातृभूमी,मातेसारखेच पवित्र  सर्वश्रेष्ठ दैवत आहे.
  106. निरोगी मुले ही राष्ट्राची खरी संपत्ती आहेत.
  107. माता ,पिता, गुरुआणि स्वदेश यांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा.
  108. जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा.
  109. मायभूमीतील मातीसुद्धा सर्व जगाहून प्रिय वाटते.
  110. माणसाने माणसाशी माणुसकीने वागणे हाच खरा मानवधर्म होय.
  111. संस्कृतीचा उगम आपल्या घरापासून होतो.

आपला छान मौल्यवान अभिप्राय येथे नोंदवा .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने