ब्लॉग कसा बनवावा मराठीमध्ये संपूर्ण माहिती | blog kasa banvava | how to make blog



ब्लॉग कसा बनवावा याविषयी मराठीमध्ये संपूर्ण माहिती बघूया(blog kasa banvava) How to make blog on blogger.

ब्लॉग बनवण्यासाठी आवश्यक गोष्टी
   ब्लॉग बनवण्यासाठी तुम्हाला स्वतःचा एक Gmail id व त्याचा पासवर्ड या दोनच गोष्टी आवश्यक असतात 
     पण स्पर्धेच्या या जगामध्ये ब्लॉग टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी आवश्यक असते ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमची पॅशन, तुमच्या अंगात असलेली चिकाटी. या दोन गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर ब्लॉगिंगच्या क्षेत्रात तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही
   ब्लॉग बनवण्याच्या  पायऱ्या
1) प्रथम blogger.com या          संकेतस्थळावर जा.
    अशी विंडो ओपन होईल विंडो चा रंग बदल होत राहील त्यामुळे चिंता 
नसावी

2) sign in ह्या बटणावर क्लिक करा       तिथे तुमचा Gmail व            password टाकून लॉगिन करा.
त्यानंतर 
3) New blog ला क्लिक करा
खाली दाखवल्याप्रमाणे एक विंडो ओपन होईल 

त्यामध्ये Blog चे Title (शीर्षक) द्या  .  त्याखाली तुम्हाला ठेवायचा तो Blog  address टाका
Ex:- www. purnmarathi.blogspot.com
   टीप-
blogspot.com आधीच लिहिलेले असते  .
तुम्ही टाकलेल्या address चे नाव जर आधीच कुणी घेतले असेल तर तिथेच तसा लाल रंग यामध्ये मेसेज येतो

4) त्या खाली हवे ते Template निवडा व create blog ला click करा.
 झाला तुमचा blog तयार.
-------------------------------------------
 तुम्ही निवडलेल्या Template वर blog ची रचना अवलंबून असते.
प्रत्यक्ष पोस्ट लिहिताना

5) आता New post यावर click केल्यावर तिथेेेेे MS-WORD चे Page दिसेल तिथे तुम्हाला हवे ते post लिहा योग्य तेेेेे डिझाईन करून post सुंदर सजवा व publish करा. त्यानंतर view blog करा.
तुम्ही लिहिलेली पोस्ट या ठिकाणी दिसेल
  6)  New page ला click करा त्याचे Title टाका व पोस्ट लिहा. पोस्ट लिहून झाल्यानंतर सेव करा. सेव्ह केलेली पोस्ट इतरांना दिसत नाही ;म्हणून ती publish करा मग ही पोस्ट सर्वांना दिसेल .
     त्यानंतर हवे तेवढे पेजेस तुम्ही हवे ते टायटल टाकून तयार करू शकता
  नंतर Layout   वर जा ,तिथे header मध्ये ब्लॉगच्या मुखपृष्ठासाठी इमेज ॲड करा 



   त्याखाली add gazzet वर क्लिक करून पेजेस हे गॅजेट ऍड करा त्यात अगोदर तयार केलेल्या केलेले पेजेस सिलेक्ट करून सेव करा मग हे पेज एस तुम्हाला ब्लॉगच्या मुखपृष्ठावर आडव्या लायनीत एका खालोखाल दिसतील


    add gazzet  वर क्लिक करून तुम्हाला हवी ती gazzet तुम्ही ऍड करू शकता.


   आता Layout पेजच्या डाव्या कोपऱ्यात   template design वर क्लिक करा येथे ब्लॉक ची डिझाईन करता येते .तेथे लेआउट वर साईड बार कसे हवे ते सिलेक्ट करा .व Apply to blog करा .


  शेवटी सर्वात महत्त्वाच्या advanced या मेनू वर जा तिथून आपल्या आवडीची सर्व रंगरचना करून घेता येते . तुम्हाला आवडेल ती रंगसंगती निवडा .खाली तुम्हाला लाईव्ह ब्लॉगवर त्या रचना दिसतील . सर्व रचना झाल्यावर Apply to blog  करायला विसरू नका.


आपण google drive(गुगल ड्राईव्ह) किंवा dropbox(ड्रॉप बॉक्स ) यावर आपल्या फाईल सेव्ह करून त्यांची लिंक तिथून कॉपी करून ब्लॉगवर हवी तेथे पेस्ट करू शकतो.
 इतर वेबसाईटच्या लिंक सुद्धा याद्वारे आपल्याला देता येऊ शकता.

पोस्ट वाचून झाल्यानंतर शेअर करायला अजिबात विसरू नका. व सबस्क्राईब करा .म्हणजे नवीन पोस्ट टाकल्यावर तुम्हाला लगेच माहिती मिळेल ;आणि काहीही अडचण असेल तर कमेंट करून मला कळवा. मी नक्की मदत व मार्गदर्शन करेल . धन्यवाद

आपला छान मौल्यवान अभिप्राय येथे नोंदवा .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने